एक पत्र समाजासाठी....
हे पत्रक अवश्य वाचा, आणि शक्य झाल्यास विचार करा...
गाडगे महाराज हे एक संत होते ज्यांना देव कोण आहे याची स्पष्ट जाण होती आणि ज्यांनी अज्ञान,अंधश्रद्धा आणि अपवित्रता नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम घेतले ते वंचित आणि निराधारांच्या भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी. गाडगेबाबा हे दीनदुबळ्या, वंचित, अनाथ आणि अपंगांना मदत करणारे एक प्रसिद्ध संत आहेत. जनतेच्या देणग्या घेऊन, माणसात देव शोधणाऱ्या या संताने महाराष्ट्रभर विविध ठिकाणी धर्मशाळा, अनाथाश्रम, आश्रम आणि अनाथांसाठी शाळा सुरू केल्या. वंचित, दुर्बल, आणि अनाथ हे त्यांचे दैवत होते. गाडगेबाबा हे या देवतांचे सर्वात रसिक असायचे. प्रत्येक व्यक्तीला निरोगी, स्वच्छ व आनंदी जीवन जगण्याचा हक्क आहे.
दीन दुबळ्यांची सेवा करा.
भुकेलेल्याना खाऊ घाला
पृथ्वीवर कुठे देव आहे तो आई-बाप आहे.
—राष्ट्रसंत गाडगे महाराज
गाडगे महाराज हे समाजसुधारक होते ज्यांनी वंचित आणि निराधारांमधील अज्ञान, अंधश्रद्धा आणि घाण दूर करण्यासाठी लढा दिला. दुर्बल, निराधार, अनाथ, अपंग यांना मदत करणारे अद्भूत संत गाडगेबाबा. त्यांच्याच पावलांवर पाऊले ठेवत परिसस्पर्श मल्टीपर्पज फाउंडेशन २८ सेक्शन, श्रीराम नगर, पूनम हॉटेल मागे,आशेळेगाव, कल्याण (पूर्व) च्या सौ. वैशालीताई नेमाडे यांची ही संस्था असून त्यांचे पती व प्रेरणास्थान श्री. कुंदन प्रेमचंद नेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रेमकुंज वृद्धाश्रम गेल्या तीन वर्षांपासून अनेक वृद्धांच्या आधाराचे केंद्र बनला आहे.
प्रेमकुंज वृद्धाश्रमाच्या माध्यमातून मुला बाळांपासून दुरावलेले, दुर्लक्षित झालेले, शारीरिक मानसिक हिंसेचे बळी झालेले, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना फार मोठा मदतीचा हात मिळालेला आहे. बहुतांशी सर्वच वृद्धांना असलेली एक मोठी तक्रार म्हणजे अंगदुखी होय, काहींना पॅरालेसिस आहे. आज येथे सर्व वृद्ध अतिशय आनंदात व उत्साहात राहतात. आपले आयुष्य मनसोक्त जगतात. जीवनातील सर्व दुःख विसरून हसतात, खेळतात, मजा मस्करी करतात. इतपत की आम्हाला देखील ते त्यांच्या मुलांप्रमाणेच मानतात व साश्रू नयनांनी येथेच मृत्यू यावा अशी कामना देखील व्यक्त करून दाखवतात. इतर सर्व व्यक्तींप्रमाणे त्यांना ज्या ज्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देता येईल आम्ही त्या सर्व देण्याचा अतोनात प्रयत्न करतो.
मात्र एवढी सर्व तारेवरची कसरत करताना आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, आमची मनापासून अपेक्षा आहे की आपण देखील आमचं पालकत्व घ्यावं, आमच्या गरजा वेळोवेळी समजून घ्याव्यात व यथायोग्य मदत उपलब्ध करून द्यावी तसेच उल्हासनगर सारख्या व्यापार्यांच्या शहरातील व्यापारी बांधव, समाजसेवक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व उद्योगपती इतर बांधवांकडून आम्हांला मदतीची तीव्र गरज आहे. जेणेकरून या पूर्ण कर्मात आपला देखील खारीचा वाटा असेल. मुलांवर वर्षाला शाळा व क्लासेसलाच सत्तर सत्तर हजार रुपये खर्च करणारे पालक आईबपासाठी सातशे रुपये खर्च करायला तयार नसणे ही खरच लाजिरवाणी बाब आहे. कर्जाने पिडीत आत्महत्या करणार्यांच्या देशात व उपासमारीने मरणार्यांच्या देशात वाढदिवसाला हजारो रुपये खर्च केले जातात दोन-दोन, तीन-तीन केक कापले जातात नाका तोंडावर लावून नासाडी केले जातात मात्र गरीब आईबापाच्या बाबतीत विचार करायची वेळ येते. शाळा कॉलेजेस च्या पिकनिक्स किंवा स्टडी टूर्स महागड्या resorts वर जातात मात्र वृद्धाश्रमात वृद्धाच्या सेवेतून संस्कार जागवण्याचे व टिकवण्याचे आपल्याला पटत नसते किंवा लाजिरवाणे वाटते. आम्ही आमच्याच वैयक्तिक उत्पन्नातील ८५% हून अधिक आमच्या आश्रमातील लोकांच्या सेवेत खर्च करतो. आमच्या कार्याला लोक वेडेपणा म्हणतात मात्र आम्हांला एक वेगळाच आनंद मिळतो या वेडेपणात हे या व्यावहारिक दृष्टीने समजूतदार व सुखी लोकांना कसे समजवावे. आपल्या पुढाकारानेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
देव हा देवळात नसतो तर प्राणिमात्रांच्या, दीन-दुबळ्यांच्या व वृद्धांच्या सेवेत असतो. पृथ्वीवर जर कुठे देव असेल तर तो आई-बापाच्या रूपातच असतो. हीच आमची स्पष्ट धारणा आहे. एक मुलगा/मुलगी म्हणून पाहिलेत तर आई बापच्या उपकार व संस्कारांची परतफेड करणे शक्य नाही. आई बापासारखे निस्वार्थ प्रेम मुलांवर कोणीही कधीच करु शकत नाही व शकणार नाही.
आम्हाला आश्रमाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी अनेक साहित्याची आवश्यकता आहे व आपल्या मदतीची तीव्र आवश्यकता आहे. आम्हाला सुमारे पन्नास खाटांची व गाद्यांची, गोधड्याची आवश्यकता आहे, फ्रिज,कुलर, सार्वजनिक कक्षात किमान एक एसीची व्यवस्था, किमान 40ltr / hr वॉटर प्युरिफायर, ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांसाठी किमान दोन बाकडे, तसेच अन्न धान्य अशा संसाधनांची आवश्यकता आहे. आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजबांधव या नात्याने शक्य तितक्या लवकर फुल ना फुलाची पाकळी म्हणून यापैकी जी शक्य आहे व आवश्यक ती मदत करावी हीच नम्र विनंती. आपल्या या अमुल्य मदतीने अनेक वृद्धांचे भले होईल.
आमची संस्था ही रजिस्टर्ड संस्था असून करपात्र व्यक्तींना आयकर नियमानुसार वार्षिक उत्पन्नात ८०G आर्थिक सवलत मिळते. विचार बदला तरच जग बदलेल. मुलांना संस्कारक्षम बनवा अन्यथा आज मजेत पाहणाऱ्या कोणावरही उद्या अशी वेळ येऊ शकते.
दान करण्यासाठी इथे क्लिक करा.
आमचा संघ
वैशाली नेमाडे
संस्थापक
कुंदन नेमाडे
संस्थापक